ग्रामपंचायत टेटवाली

हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हा मधील विक्रमगड तालुका येथे वसलेले एक आदिवासी बहुल गाव आहे. टेटवली गाव परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल आढळते. गावात पारंपरिक आदिवासी संस्कृती व जीवनशैली आजही जपली गेली आहे.

सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार टेटवली गावात सुमारे ५०० ते ६०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे २५०० ते ३००० दरम्यान असून त्यामध्ये पुरुष व महिला संख्या जवळपास समान आहे. येथे प्रामुख्याने वारली (आदिवासी) व कुणबी समाजातील लोक वास्तव्य करतात.

कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून ते भात शेती, भाजीपाला उत्पादन यामध्ये कार्यरत आहेत. आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार म्हणून काम करतात. तसेच काही कुटुंबे कुक्कुटपालन, बकरीपालन व लघुउद्योग करून आपला उदरनिर्वाह करतात.

श्रावण महिन्यात, विशेषतः पावसाळ्यात, टेटवली परिसरात नैसर्गिकरित्या उगवणारी एक खास भाजी म्हणजे अळंबी (मशरूम) होय. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सतत कोसळणाऱ्या पावसाच्या वातावरणात ही भाजी रानात उगवते. अळंबी अत्यंत चविष्ट व पौष्टिक असल्याने स्थानिक लोकांमध्ये तिची मोठी मागणी असते

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
2700
२
पुरुष लोकसंख्या
1360
३
महिला लोकसंख्या
1340
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
350

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
३उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
४अंगणवाडीहोय

11

होय
५प्राथमिक शाळाहोय8होय
६माध्यमिक शाळाहोय2होय
७उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
९समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत टेटवाली

बँकेचे नाव : ठाणे मध्यवर्ती बँक 

शाखेचे नाव:टेटवाली

अकाउंट नंबर : 002400300008817

आई एफ एस सी कोड : TDCB0000024

पत्ता : ग्रामपंचायत टेटवाली ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( 401605)